250 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

0
55

श्रीनगरमध्ये ‘एनएसजी’ तैनात होणार

श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमध्ये 250 दहशतवादी सक्रिय असून तितकेच “लाईन ऑफ कंट्रोल’ पलिकडून काश्‍मीर खोऱ्यामध्ये घुसखोरीसाठी सज्ज असल्याची माहिती आज लष्कराच्यावतीने देण्यात आली. श्रीनगरमधील चिनार कॉर्पचे (15 कॉर्पस) जनरल कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल ए.के. भट यांनी बारामुल्लामध्ये पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. “एलओसी’पलिकडील वेगवेगळ्या तळांवर दहशतवाद्यांचे गट घुसखोरीसाठी तयार आहेत.

“एलओसी’च्या पलिकडे “15 कॉर्पस’च्या हद्दीमध्ये सुमारे 250 ते 300 जण 25-30 जणांच्या गटांमध्ये वेगवेगळ्या तळांवर आहेत, असे लेफ्टनंट जनरल भट यांनी सांगितले.

उत्तर काश्‍मीरमधील स्थिती ही दक्षिण काश्‍मीरपेक्षा अधिक चांगली आहे. दक्षिण काश्‍मीरशी तुलना करता उत्तर काश्‍मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांची संख्या कमी आहे. श्रीनगरमध्ये दहशतवाद विरोधी कारवाईसाठी राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी) तैनात केले जाणार का, असे विचारले असता. लेफ्ट. जन. भट यांनी होकारार्थी उत्तर दिले. श्रीनगरमध्ये पोलिसांबरोबर “एनएसजी’ही तैनात केले जातील, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here