सुरेश रैनाचे ‘हे’ विक्रम कोणीच मोडू शकत नाही!

0
130

नवी दिल्‍ली : रैनाने आपल्‍या जिगरबाज खेळीच्‍या जीवावर आतंरराष्‍ट्रीय क्रिकटमध्‍ये स्‍व:तचे वेगळे स्‍थान निर्माण केले आहे. आयपीएलचे नाव येताच सुरेश रैनाचे नाव समोर येते. खर्‍या अर्थाने आयएपीएलचे हंगामा कुणी गाजवले असतील तर सुरेश रैनानेच.  कारण आयपीएलमधील जास्‍तीत- जास्‍त विक्रम सुरेश रैनाच्‍या नावावर आहेत.  मात्र, मागच्‍या काही दिवसांपासून सुरेश रैनाला भारतीय क्रिकेट संघात स्‍थान पक्‍के करण्‍यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. सुरेश रैना मधल्‍या फळीतील फंलदाजीसोबतच त्‍याला जोडून गोलंदाजी तसेच उत्‍कृष्‍ठ क्षेत्ररक्षणामुळे आयएपीएलचा हा राजा नेहमी चर्चेत असतो. 

रैनाच्‍या नावावर असे काही विक्रम आहेत जे विराट कोहली ते रोहित शर्मासारखा धडाकेबाज क्रिकेटर तोडू शकत नाही. भारताकडून तिन्‍ही फॉरमॅटमध्‍ये (कसोटी, एकदिवसीय, आणि टी-20) शतक करण्‍याचा विक्रम सुरेश रैनाच्‍या नावावर आहे. सुरेश रैना हा विक्रम करणारा पहिला भारतिय क्रिकेटर आहे. त्‍यामुळे त्‍याचा हा विक्रम कोणच तोडू शकत नाही. याशिवाय सुरेश रैना १२ वा भारतीय फलंदाज आहे, ज्‍याने आपल्‍या पदार्पणात कसोटीमध्‍ये शतक केले आहे.

आयपीएलचा किंग म्‍हणून सुरेश रैनाची क्रिकेट विश्‍वात ओळख आहे. आयपीएलमध्‍ये सर्वप्रथम ३००० धावा करण्‍याचा विक्रम सुरेश रैनाच्‍या नावावर आहे. रैना एकमेव असा भारतीय फलंदाज आहे, ज्‍याने टी-20 आणि एकदिवसीय विश्‍वकप क्रिकेटमध्‍ये शतक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here