सज्जनगड रस्त्यावर दरड कोसळली

0
97

परळी : परळी खोऱ्यात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे  सोमवारी रात्री सज्जनगड रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

परळी आणि सज्जनगड परिसरात काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे लहान मोठी दगडे रस्त्यावर येत असल्याने वाहतूक धोकादायक झाली आहे. सोमवारी रात्री सज्जनगड मार्गावर दरड कोसळली. यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक ठप्प झाली होती तर लहान चार चाकी  आणि दुचाकींची वाहतूक धोकादायक रित्या सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here