संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे

0
11

मुंबई : वेतनवाढीसाठी अघोषित बंद पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवरील केलेली निलंबनाची कारवाई मागे घेत प्रशासनानं कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. वेतन कराराशी संबंध नसताना संपात सहभागी झाल्याने सेवेतील तब्बल 1 हजार 10 कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाकडून कामावरुन कमी करण्यात आले होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर एसटी प्रशासनानं सकारात्मक प्रतिसाद देत संपकरी कर्मचाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे. तसंच 1 जुलैपासून त्या कर्मचाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश एसटी प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here