शुक्राचार्य भारती यांचे निधन

0
100

गोखळी : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील शुक्राचार्य रामचंद्र भारती (46) यांचे पुणे येथील संचिती रूग्णालयामध्ये उपचार सुरू असताना निधन झाले. 
शेरे, ता.कराड येथील कृष्णा माध्यमिक विद्यालयात उपशिक्षक म्हणून 1996-97 पासुन कार्यरत होते. इयत्ता दहावीच्या परिक्षेसाठी केंद्रावर 7 फेब्रुवारी रोजी बाके घेऊन जात असताना ट्रॉलीमधून पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी कृष्णा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथील संचिती रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याऐवजी त्यांची प्रकृती गंभीर होत गेली. आज सकाळी (बुधवार) नऊ वाजता त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक विवाहित भाऊ, दोन विवाहित बहिणी, नात, नातू असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here