राज्यस्तरीय सह्याद्री शिक्षकरत्न पुरस्कार नितीन गायकवाड यांना प्रदान

0
47

सातारा : अहमदनगर येथील सह्याद्री उदयोग समूहाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्यांना ‘ राज्यस्तरीय सह्याद्री शिक्षणरत्न पुरस्कार’ दिला जातो. यंदाच्या पुरस्कार सातारा तालुक्यातील निवडुंगवाडी (सोनापूर) नितीन गायकवाड यांना पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते नुकताच अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला.

सह्यादी समूहाच्यावतीने राज्यातील सहकार, सामाजिक, शैक्षणिक, अर्थकारण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सह्याद्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात सातारा येथील सह्यादी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक नितीन बळीराम गायकवाड यांना शिक्षण क्षेत्रातील यशाबद्दल राज्यस्तरीय सह्याद्री शिक्षकरत्न पुरस्कार 2018 प्रदान करण्यात आला. यावेळी शिवस्मारक समिती अध्यक्ष, आमदार विनायकराव मेटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, सह्याद्री समूहाचे संदीप थोरात, सह्याद्री कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक बळीराम गायकवाड, शकुंतला गायकवाड, सुभाष गायकवाड, उज्वला गायकवाड, सुजाता जगताप, विजय जगताप, संदीप ढाणे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here