मतदान केल्यानंतर पंतप्रधानपदाच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…

0
135

राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी मुंबईमध्ये पेडर रोड परिसरात आज मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी काल पंतप्रधानपदाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी भाष्य केले. मला मिस कोट केलं असल्याचं शरद पवार म्हणाले.  त्या मुलाखतीत मला विचारलं होतं की, राहुल गांधींशिवाय इतर कोण पर्याय आहेत, तर त्यावर मी मायावती, ममता, चंद्राबाबू नायडू अशी नावं सांगितली.

हे ज्यांनी चुकीचं छापलं त्यांचा बालिशपणा आहे. हे केवळ टीआरपीसाठी असं छापलं असल्याचं देखील पवार म्हणाले. सोबतच देशात स्थिर सरकार येणं आवश्यक आहे. आजचा दिवस देशासाठी महत्वाचा आहे.

मुंबईतील मतदान टक्केवारी बाबत काळजी वाटते. मात्र मुंबईकर महत्वाच्या दिवशी मोठ्या संख्येने मतदान हक्क बजावतील. मुंबई मागे राहणार नाही, असेही पवार म्हणाले. मला सगळ्या निवडणुका  महत्वाच्या आहेत. मावळ काय, बारामती काय, मुंबई काय सगळ्याच निवडणुका महत्वाच्या आहेत. यावेळी लोक निर्णायक निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here