बीबी येथील जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा; तंटामुक्तीच्या माजी अध्यक्षासह पाच अटकेत

0
17

सातारा : बीबी ता.फलटण येथे पत्त्याच्या पानावर जुगार खेळणार्‍या 5 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने अटक केली असून संशयितांकडून 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांमध्ये तंटामुक्तीचा माजी अध्यक्षाचाही समावेश असून कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.

बळवंत लक्ष्मण नलवडे (वय 63, रा.बीबी), आबा बबन तरडे (वय 48, रा.मलवडी), प्रकाश बबन बोबडे (वय 45, रा.बीबी), संजय लक्ष्मण टकले (वय 38, रा.मलवडी), गणेश विठ्ठल नाकयवडी (वय 40, रा.आळजापूर सर्व ता.फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे असून यातील बळवंत नलवडे हा माजी तंटामुक्ती अध्यक्ष आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बीबी गावच्या हद्दीत जुगार खेळत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. पोलिसांनी पथक करुन त्यानुसार छापा टाकला असता संशयित मोकळ्या रानात बाभळीच्या झाडाखाली जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर परिसरातून दुचाकी, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूळ 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला असून तो जप्त करण्यात आला.

दरम्यान, बीबी गावच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. यावेळी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी सर्व संशयित व मुद्देमाल ताब्यात घेवून लोणंद पोलिसांकडे वर्ग केले आहे. पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसणे, शशिकांत मुसळे, पोलिस हवालदार नागे, मोहन नाचण, रविंद्र वाघमारे, योगेश पोळ, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, गणेश कचरे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here