पूजा सावंतला स्माइल फाऊंडेशनचा पुरस्कार

0
108

मुंबई : मराठीतील कलरफूल अभिनेत्री पूजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील घेतली असून, तिच्या अभिनयकौशल्याला चारचाँद लावणा-या या पुरस्कारांच्या यादीत आणखीन एक मानाचा पुरस्कार सामील होणार आहे. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १४९व्या जयंतीप्रित्यर्थ स्माईल फाऊंडेशनद्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी पूजाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नावाजण्यात येणार आहे. येत्या २१ एप्रिल रोजी वांद्रे येथील सेंट अ‍ॅड्रय़ूज ऑडिटोरियममध्ये पूजाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

स्माईल फाऊंडेशन अखत्यारित देण्यात येणारा हा पुरस्कार दादासाहेब फाळके यांच्या कुटुंबीयांकडून चित्रपटसृष्टीतील यशस्वी कलाकारांना त्यांच्या कामगिरीसाठी देण्यात येतो. त्यानुसार यावर्षीचा हा मान ‘लपाछपी’ सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पूजाला मिळाला. केवळ भारतातूनच नव्हे तर, जगभरातून ‘लपाछपी’ आणि पूजा सावंतच्या अभिनयाची दखल घेतली जात आहे.

‘श्रावणक्वीन’ झाल्यानंतर पूजा सावंतने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘क्षणभर विश्रांती’ या तिच्या पहिल्याच चित्रपटात तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. यानंतर झकास, सतरंगी रे, पोस्टर बॉईज , नीळकंठ मास्टर, दगडी चाळ, भेटली तू पुन्हा, लपाछपी या चित्रपटात तिने आपले अभिनय कौशल्य दाखविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here