नाना लवकरच करणार तेलुगु सिनेसृष्टीत पदार्पण

0
98

मुंबई : गेल्या वर्षी नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्तने मीटू चळवळीच्या माध्यमातून अनेक आरोप केले होते. नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे सर्व आरोप फेटाळले असले, तरी त्याची झळ नानांच्या कारकिर्दीला नक्कीच बसली. मीटूच्या धुरळ्यानंतर ‘हाउसफुल ४’ मधून नानांना डच्चू देण्यात आला. या सर्व घडामोडीनंतर नाना पाटेकर आता थेट तेलुगु चित्रपटात झळकणार आहेत. 

नाना पाटेकर तेलुगु चित्रपटात पदार्पण करू शकतात. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्या ‘नन्ना नेनू’ या चित्रपटात नाना नकारात्मक भूमिका साकारणार असून, ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नाना पाटेकर यांच्या संपर्कात असून, लवकरच या भूमिकेसाठी त्यांना निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. या भूमिकेसाठी नाना पाटेकर योग्य आहेत, असे श्रीनिवास यांना वाटते. यानंतर नाना पाटेकर याच्याशी चर्चा सुरू करण्यात आली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here