दुचाकीच्या डिकीतून रोख रकमेसह एक लाखांचे दागिने लांबवले

0
110

सातारा : बँकेतून 1 लाख रुपये काढल्यानंतर त्यातील सुमारे 50 हजार रुपयांचे दागिने इन्शुरन्स कंपनीतून सोडवून घरी जात असताना अवघ्या पाच मिनिटांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या डिकीतून रोख 42 हजार रुपयांसह तब्बल 1 लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी देगाव फाटा येथे ही घटना घडली असून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सौ.शोभा शिवाजी भोसले (रा.कारंडवाडी ता.सातारा) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी दुपारी तक्रारदार यांनी बँकेतून 1 लाख रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर गहाण ठेवलेले सुमारे 50 हजार रुपये देवून दागिने सोडवले. सातार्‍यातील ही कामे झाल्यानंतर तक्रारदार या दुचाकीवरुन देगावकडे निघाल्या होत्या. देगाव फाटा येथे आल्यानंतर मात्र घरामध्ये मुलांना खावू घेण्यासाठी त्या दुचाकी पार्क करुन गेल्या. याच संधीचा गैरफायदा घेवून अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या डिकीतील रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला.

तक्रारदार महिला दुकानातून आल्यानंतर डिकीतील पैसे व दागिन्यांची बॅग नसल्याचे लक्षात आले. या घटनेने त्या घाबरल्या परिसरात सर्वत्र शोध घेतला मात्र बॅग सापडली नाही. अखेर अज्ञाताने चोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here