ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जींचा भाजपात प्रवेश

0
107

मला भाजपासोबत काम करायचे आहे, असे ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पत्रकारांना सांगितले.

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला असून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 2004 मध्ये चॅटर्जी यांनी काँग्रेसकडून पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवली होती.

70 वर्षीय मौसमी चॅटर्जी यांनी बुधवारी भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मंगळवारी त्यांनी दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट देखील घेतल होती. मला भाजपासोबत काम करायचे आहे, असे त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पत्रकारांना सांगितले. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व भावते, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. आगामी लोकसभा निवडणूक भाजपाकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

मौसमी चॅटर्जी यांनी 2004 मध्ये कोलकाता उत्तर – पूर्व या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांचा डाव्या पक्षांचे उमेदवार मोहम्मद सलीम यांनी पराभव केला होता. यानंतर मौसमी चॅटर्जी या राजकारणापासून दूर होत्या. मौसमी चॅटर्जी अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांमध्ये काम केले असून अमिताभ बच्चन – दिपीका यांच्या पिकू या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकरली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here