खा. उदयनराजे हे राजकारणातील चालते बोलते मुक्त विद्यापीठ : देवेंद्र फडणवीस, मेडीकल कॉलेज, हद्दवाढीचा प्रश्‍न मार्गी लावण्याची घोषणा

0
106

सातारा: सातारा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आणि शिवछत्रपतींचे थेट तेरावे वंशज श्री.छ.उदयनराजे हे जरी राष्ट्रवादीकडून लोकसभेवर निवडून आले असले तरी ते राजकारणातील एक चालते बोलते मुक्त विद्यापीठ आहेत. त्यांच्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम व नियम ते स्वतः तयार करतात. आणि नियम न पाळणार्यांना शासनते स्वतः करतात, अशी जोरदार फटकेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीवीस यांनी खा.उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस सोहळ्यात केली. यावेळी त्यांनी अजिंक्यतारा किल्ला जिर्णोध्दार व सुशोभिकरणासाठी २५ कोटी, सातारा शहराची हद्दवाढ, तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मेडीकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लावण्याच्या आश्वासनाच्या रूपाने उदयनराजेंना वाढदिवसाची खास भेट दिली. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद उपस्थित राहिले तर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार, पदाधिकार्‍यांनी अनुपस्थित राहत कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

खा.उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी सातार्‍यातील पोवईनाका येथील ग्रेड सेप्रेटर, कास तलाव उंची वाढविणे व नगर पालिका प्रशासकीय इमारतीचे भुमीपुजन आदी. कार्यक्रमांच्या शुभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद मैदान येथे आयोजित भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे डिजिटल भूमीपुजन करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार, ना.चंद्रकात पाटील, ना.गिरीष महाजन, पालकमंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, आ.जयकुमार गोरे, आ.आनंदराव पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे आदी.उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, खा.उदयनराजे हे एखाद्या मित्राचा जीवलग मित्र आहेत जर जेव्हा अन्याय होईल तेव्हा ते हल्लोबोलकरतात. उदयनराजे मला अनेकदा भेटत असतात. त्यावेळी ते स्वत:साठी काही न मागता साताऱ्याच्या विकासाचीच मागणी करतात. आमच्या चंद्रकात पाटलांनी यापैकी काही मागण्या पूर्णही केल्या आहेत. आम्ही सगळे त्यांच्यावर छत्रपतींचे वंशज म्हणून प्रेम करतो, असे फडणवीस यांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी माझ्याकडे तीन मागण्या केल्या आहेत. त्या तिन्ही ही मागण्या लवकरात लवकर पुर्ण करणार असून त्यापैकी अजिंक्यतारा किल्ल्यासाठी 25 कोटी रूपये निधी देण्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करत खा.उदयनराजे यांना उदंड आयुष्य लाभण्याची मनोकामना यावेळी व्यक्त केली.

खा.शरद पवार म्हणाले, खा.उदयनराजे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जनसामान्यांसाठी विकासांच्या कामाची सुरूवात करून आदर्श निर्माण केला आहे. छ.शिवाजीमहाराजांप्रमाणे खा.उदयनराजे यांनी कायम रयतेचा विचार केला. तुम्ही सर्व जण त्यांना सातारा जिल्ह्यात आणि राज्यात पहात असाल परंतु आम्ही दिल्लीत एकत्र काम करत असतो. तेव्हा संपुर्ण देशातील खासदारांना उदयनराजेंबद्दल औत्सुक्य असते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचे वंशज हे तुमच्या पक्षाचे खासदार आहेत त्यांना आम्हाला भेटायाचे आहे अशी विनंती करतात. परंतु जेव्हा त्यांची उदयनराजे यांच्याशी भेट होते तेव्हा त्यांच्या विनम्रतेबद्दल त्यांना विशेष वाटते. खा.उदयनराजे खासदार झाल्यापासून त्यांनी कायम सातारा जिल्ह्याचे व राज्याचे प्रश्‍न मांडले. त्यांनी अशाच प्रकारे कार्य करून छ.शिवाजी महाराजांचा नावलौकीक जगभर पोहचवावा, अशी इच्छा पवार यांनी व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना खा.उदयनराजे म्हणाले, काल, आज आणि उद्या कायम जनतेला केंद्रबिंदु मानून कार्य करित आलो आहे. आणि यापुढे ही करत राहणार. सत्ता असो वा नसो, सत्तेला फारशी मी किंमत देत नाही. जो पर्यंत श्‍वास आहे तो पर्यंत जगणार फक्त तुमच्यासाठीच असे म्हणत त्यांनी उपस्थितांच्या भावनेला हात घातला. जनतेने जे आजपर्यंत प्रेम दिले ते व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात. या प्रेमामुळे ऊर्जा मिळते. मी सुध्दा तुमच्यापैकी एक माणूस आहे. जरी राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी माझ्याकडून काही चुका होत असतील तर मला आर्वजुन सांगत जावा. मी तुमच्या भावनांचा कदापि अवमान होवू देणार नाही. शेवटी तुमच्या मुळेच मी आहे हे देखील मी कदापि विसणार नाही, अशा भावपुर्ण शब्दात जमलेल्या जनसमुदायाचे आभार खा.उदयनराजे यांनी मानले

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भाषणे झाली. आमदार शंभुराज देसाई यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. तर या कार्यक्रमाचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी मानले.
आजच्या या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार गजानन बाबर, आमदार आनंदराव पाटील, आमदार मोहनराव कदम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, यांच्यासह जिल्ह्यातील कॉंग्रेस आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here