कोल्हापूर परिक्षेत्रीय युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप अंतिम स्पर्धेसाठी अक्षय कुमार उपस्थित राहणार : संदीप पाटील

0
105

सातारा : कोल्हापूर परिक्षेत्रीय युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप अंतिम स्पर्धा दि. 24 रोजी सातारा येथील यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद मैदानाच्या पाठीमागे होणार असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व सिनेस्टार अक्षय कुमार उपस्थित राहणार असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

युवकांचे विचार, मत व समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी पोलिस ठाणे, उपविभाग व जिल्हास्तरीय युथ पार्लमेंटचे आयोजन करण्यात आले आहे. यातूनच आता कोल्हापूर परिक्षेत्रातील जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या 8 वी ते 12 वी या गटातील 5 संघ, 13 वी ते पदवीधर या गटातील 5 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये ज्वलंत विषयावर विचार मांडले जाणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री, अक्षय कुमार व कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आदी मान्यवर उपस्थितीतांना मार्गदर्शन करणार आहेत.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला राहणार असून जास्तीत जास्त युवकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पोलिस दलाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, सकाळपासून स्पर्धेला प्रारंभ होणार असून दुपारी मान्यवरांच्या उपस्थित बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here