ऑपरेशन ऑलआऊट २; हिटलिस्टवर २१ दहशतवादी

0
67

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये काल (शुक्रवार दि.२२) कंठस्नान घालण्यात आलेल्या चार दहशतवाद्यांमध्ये इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-काश्मीर या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याचाही समावेश होता. काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधातील या कारवाईनंतर आणखी २१ दहशतवादी सुरक्षा दलाच्या हिटलिस्टवर आहेत. काल झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले हे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू करण्यात आल्यानंतरची ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

सध्या हिटलिस्टवर असलेल्या २१ दहशतवाद्यांना संपवण्यासाठी नवीन मोहिम हाती घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यात हिजबुल मुजाहिद्दीनच्या ११, लष्कर ए तोयबाच्या सात आणि जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांसह तिघांचा समावेश आहे. सुरक्षा दलाच्या निशाण्यावर असलेले दहशतवादी ठार करणे हेच मुख्य लक्ष्य असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

गुप्तचर संस्थांना सुरक्षा दलाच्या हिटलिस्टवर असलेल्या दहशतवाद्यांची अधिक माहिती गोळा करण्यास सांगितली आहे. २१ दहशतवाद्यांपैकी सहा जणांना ए++ कॅटेगरीत ठेवले आहे. कोणत्या दहशतवादी किती हल्ल्यांमध्ये होता. तसेच कोणत्या क्षेत्रात किती प्रमाणात दहशत आहे यावर आधारीत कॅटेगरी तयार करण्यात आली आहे.

हिटलिस्टवर असलेले २१ दहशतवादी मारले गेल्यास काश्मीरमध्ये शांततेचे वातावरण निर्माण होईल. हिटलिस्टवरील या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर पुन्हा सहजासहजी दहशतवाद डोके वर काढणार नाही. ज्या दहशतवाद्यांना ए ++ कटेगरीत ठेवले जाते तेव्हा त्यांच्यावर १२ लाख रुपयांचे बक्षिस ठेवले जाते. हिटलिस्टमध्ये असलेले दहशतवादी सर्वाधिक काश्मीरमधीलच आहेत यात काही शिष्यवृत्ती मिळालेले संशोधक देखील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here