‘एसी’च्या कुलिंगला सरकार लावणार लगाम !

0
92

नवी दिल्ली :  एअर कंडिशनरसाठी किमान तापमानाची मर्यादा लवकरच २४ डिग्री सेल्सियस करण्याचा विचार केंद्रीय ऊर्जा मंत्रालय करत असून तसं झाल्यास वर्षाकाठी देशभरात २० अब्ज युनिट विजेची बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे. याबाबत पुढील ४ ते ६ महिने जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे तसेच सर्वेक्षणही घेतले जाणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने ‘एसी’बाबत जनजागृती अभियान हाती घेतले असून या अभियानाचा शुभारंभ आज केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना सिंह यांनी, एसीचे किमान तापमान केवळ १ डिग्री सेल्सियसने वाढवले तरी ६ टक्के विजेची बचत होऊ शकेल, असा दावा केला.

आपल्या शरिराचं तापमान साधारण ३६ ते ३७ डिग्री सेल्सियस आहे मात्र वातानुकुलित हॉटेल्स आणि कार्यालयांमध्ये एसीचे तापमान सामान्यपणे १८ ते २१ डिग्री सेल्सियस ठेवले जाते. यामुळे विजेचा अपव्यय तर होतोच शिवाय आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो, असे सिंह यांनी एअर कंडिशनरची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या निदर्शनास आणले. जपानसह काही देशांत एसीचे तापमान किमान २८ डिग्री सेल्सियस ठेवण्याबाबत नियम बनवण्यात आल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here