उपळवे येथील वांजळी तलावाचे भूमिपूजन संपन्न

0
133

फलटण : उपळवे, ता. फलटण येथील वांजळी तलावाच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या ऍड. जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते काल दि. 19 रोजी करण्यात आले.

उपळवे, ता. फलटण येथील वांजळी तलावाच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन गिरवी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या ऍड. जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते काल दि. 19 रोजी करण्यात आले. यावेळी उपळवेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच युवा नेते शेखर लंभाते, माऊली सावंत उपस्थित होते. या भूमिपूजन प्रसंगी जिजामाला नाईक-निंबाळकर म्हणाल्या, उपळवे येथील स्वराज उद्योग समूहाच्या लोकनेते हिंदूरावजी नाईक-निंबाळकर साखर कारखान्यामुळे येथील लोकांचे जिवनमान उंचावलेले आहे. कारखाना निर्मितीपासून उपळवे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रथमपासूनच सहकार्य केले आहे.

या भागामध्ये विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत. वांजळी तलावाच्या दुरुस्तीच्या माध्यमातून हा तलाव भविष्यामध्ये पूर्ण क्षमतेने भरला तर याचा फायदा या परिसरातील शेतकर्‍यांना होणार आहे. जिल्हा परिषदेच्या फंडातून या तलावाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. भविष्यात या परिसरातील विविध विकासकामांसाठीही निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्‍वासनही जिल्हा परिषद सदस्या ऍड. जिजामाला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिले. दरम्यान, यावेळी उपळवे गावचे युवा नेते शेखर लंभाते, ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली सावंत, भाऊसाहेब जगताप, राजू जगताप यांच्यासह सावंतवाडा, उपळवे, वेळोशी, दर्‍याची वाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here